सिताफळाच्या बियांच्या तेलाने मालिश केल्यामुळे केस मऊ आणि मुलायम होतात. सिताफळाच्या तेलामुळे केसातील कोंडा दूर होतो. सिताफळांच्या बियांना दूधासोबत वाटून केसांना लावावे, त्यामुळे केसगळती थांबते. सीताफळ खाल्ल्याने केस काळे आणि घनदाट होतात. सिताफळामध्ये 'अ' जीवनसत्व असते आणि केसांसाठी ते लाभदायी असते. सीताफळ खाल्याने केस पांढरे होणे, टक्कल पडणे थांबते. सिताफळाच्या बियांचे चूर्ण पाण्यात उकळून त्याने केस धुतल्याने लिखा, उवा मरुन जातात. सिताफळांच्या बियांना दूधासोबत वाटून केसांना लावल्यामुळे केसांमध्ये चमक येते. सिताफळाच्या तेलामुळे केसांची मूळं भक्कम होतात. सिताफळ केसांची झटपट वाढ करण्यास मदत करते.