कमी प्रमाणात भाजल्यास अथवा चटका लागल्यास चंदन तुपात मिसळून लावावे, त्यामुळे दाह कमी होतो.
डोक्यावर चंदनाची पेस्ट लावल्याने माथा थंड राहतो आणि डोकेदुखीच्या त्रासापासून सुटका होते.
चंदन हे जंतुनाशक आहे.
शरीरातील स्नायू दुखत असल्यास चंदनाच्या तेलाने मालिश करावी.
चंदनामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतो.
चंदन त्वचेच्या एलर्जीवर रामबाण उपाय आहे.
चंदनामध्ये अल्सर विरोधी गुणधर्म असतात.
चंदनामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात, ते सौम्य तापावर फायदेशीर ठरतात.
त्वचा सुधारण्यासाठी अनेक कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये चंदन वापरण्यात येते.
शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात चंदन पेस्ट किंवा चंदन तेल घालून आंघोळ करू शकता.