आळशीला जवस असेही म्हणतात. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
या बिया त्वचा, केसांसाठी वरदान असून पचनाची समस्या दूर करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी यांचा वापर केला जातो.
आळशी ह्रदयाशी संबंधित आजारांमध्ये फायदेशीर आहे आणि कोलेस्ट्रॉल कमी करते. हे खाल्ल्याने मधुमेह आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो.
जवस आरोग्यासाठी उत्तम गुणकारी आहे. यामुळे लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यात मदत होत. तसेच हे हृदय आणि मधुमेहासाठीही वरदान आहे.
यामध्ये आढळणारे पोषकतत्वे आणि खनिजे पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवतात, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते.
या बियामध्ये ओमेगा 3 असते आणि त्यात भरपूर फायबर असते, त्यामुळे हे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
यामध्ये आढळणारे काही पोषक तत्व जळजळ, पार्किन्सन रोग आणि दमा यांसारख्या आजारांना दूर ठेवतात.
आळशी खाल्ल्याने तुम्हाला लोह, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, सोडियम, फायबर, ओमेगा 3 फॅटी अॅसिड यांसारखे सर्व आवश्यक पोषक घटक मिळतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.