अभिनेत्री क्रिती सेनॉनचा चाहता वर्ग मोठा आहे. क्रिती सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. गुलाबी साडी, ऑक्सिडाइज ज्वेलरी आणि लाइट मेक-अप अशा लूकमधील फोटो क्रितीनं शेअर केले आहेत. क्रितीच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. रिपोर्टनुसार, क्रितीच्या या डिझायनर साडीची किंमत 52, 000 आहे. क्रितीचा लवकरच बच्चन पांडे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. बच्चन पांडे चित्रपटात क्रितीसोबतच अक्षय कुमार देखील प्रमुख बूमिकेत दिसणार आहे. बच्चन पांडे चित्रपटातील ‘मेरी जान’ हे गाण काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं.