छोट्या पडद्यावरील बिग बॉस-15 या शोमुळे अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला विशेष लोकप्रियता मिळाली.



सध्या नागिन या मालिकेतून तेजस्वी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.



नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तेजस्वीनं बॉडी शेमिंग करणाऱ्यांबद्दल सांगितले.



'केवळ वजन जास्त असणाऱ्यांना नाही तर अंडर वेट असणाऱ्यांना देखील लोक ट्रोल करत असतात.' , असं तेजस्वी म्हणाली.



मुलाखतीमध्ये तेजस्वीनं सांगितलं, 'माझं वजन कमी होते म्हणून लोक ट्रोल करत होते.'



तेजस्वीनं सांगितलं, 'जर लोकांना माझा फिटनेस आवडतं नसेल तर मी त्यासाठी काहीही करू शकत नाही. महिलांनी स्वत:वर प्रेम करावे.'



'जेव्हा तुम्हाला प्रसिद्धी मिळते किंवा तुम्ही जास्त पैसे कमावता. तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे याबद्दल अनेक लोक सल्ला देत असतात', असंही तेजस्वी म्हणाली



तेजस्वी म्हणाली, 'मला माझ्या शरीराचा अभिमान वाटतो. हे शरीर जसे आहे तसे मला आवडते कारण ते मला देवानं दिलं आहे.'



'खतरों के खिलाडी 10', 'किचन चॅम्पियन 5', 'कॉमिडी नाइट्स लाइव्ह', आणि 'कॉमिडी नाइट्स बचाओ' यांसारख्या शोमध्ये देखील तेजस्वीनीनं सहभाग घेतला होता