लठ्ठपणा कमी करण्यासाठी आंबा हा देखील एक चांगला उपाय आहे. आंब्यात आढळणारे ग्लूटामाइन ऍसिड नावाचे तत्व स्मरणशक्ती वाढविण्यास उत्प्रेरक म्हणून काम करते. जर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर आंब्याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्तीही वाढते. आंब्याच्या पल्पचा पॅक चेहऱ्यावर लावल्याने किंवा चेहऱ्यावर चोळल्याने चेहरा सुधारतो. आंब्यामध्ये अनेक एन्झाईम असतात जे प्रथिने तोडण्याचे काम करतात. त्यामुळे अन्न लवकर पचते. आंब्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स कोलन कॅन्सर, ल्युकेमिया आणि प्रोस्टेट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर आहेत. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.