उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते बदाम खाल्ल्याने शरीरातील शुगर आणि इन्सुलिनचे प्रमाण वाढत नाही. बदामामुळे पचन सुधारते. त्याचप्रमाणे लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही निंयत्रण मिळते. बदामातील अॅन्टीऑक्सिडेंट घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात भिजवलेले बदाम नियमित खाल्ल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. दररोज चार ते पाच बदाम खाल्ल्याने रोगप्रतिकार क्षमता वाढते. त्याचप्रमाणे बुद्धीलाही चालना मिळते. बदाम खाल्ल्याने शरीरातील मेद कमी होऊन पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. रात्री झोपताना गरम दुधार भिजवलेले बदाम वाटून ते प्यायल्यास सर्दी कमी होते. केस गळतीची समस्या असल्यास बदाम खाणं फायदेशीर ठरतं.