शुक्राणूंची संख्या म्हणजे वीर्यच्या एका नमुन्यात आढळून आलेल्या शुक्राणूंची सरासरी संख्या होय. मुलाला जरी जन्म पुरुष देत नसले तरी वडिलांचे आरोग्य, विशेषत: त्यांच्या शुक्राणूंची स्थिती, तुम्ही गर्भवती व्हाल की नाही यावर परिणाम होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या 2010 च्या अहवालामध्ये असे देखील नमूद केले आहे की प्रति मिलीलिटर 15 दशलक्षपेक्षा कमी शुक्राणूंची संख्या ही कमी मानली जाते. पुरुषांच्या वीर्यात प्रति मिलीलीटर 15 दशलक्ष ते 200 दशलक्ष शुक्राणू असणे ही शुक्राणूंची सामान्य संख्या मानली जाते. शुक्राणूंची संख्या वाढवण्याचा उत्तम पर्याय म्हणजे व्यायाम. अक्रोड, फळे आणि भाज्या यांसारख्या अँटिऑक्सिडंट्सचे उच्च प्रमाण असलेले पदार्थ देखील शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतात. तणावाचे व्यवस्थापन करा. योग आणि ध्यान यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करा. संशोधनानुसार घट्ट कपडे घालणाऱ्या पुरुषांपेक्षा सैलसर कपडे घालणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूंचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. धुम्रपान आणि मद्यपान तसेच व्यसनाधीन पदार्थांपासून दूर राहणे शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्तेवर चांगले परिणाम करते