एकीकडे कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे व्हायरल फ्लूचा धोका, अशात तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवाल?



जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा उद्रेक पाहायला मिळत आहे. भारतातही कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचे रुग्ण आढळल्याने आरोग्य प्रशासन अलर्टवर आहे.



मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. अशा तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. प्रशासनाकडून नागरिकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस घेण्याचं आवाहनही केलं जातं आहे. यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढेल.



यासोबतच तुम्ही काही घरगती उपायांनी तुमच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकता.



इम्युनिटी वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय आणि घरगुती उपाय येथे जाणून घ्या. हा उपाय फारच प्रभावी ठरेल. शिवाय हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अधिक पैसेही खर्च करावे लागणार नाहीत.



हा सोपा आणि रामबाण उपाय म्हणजे सैंधव मीठ. यालाच रॉक सॉल्ट असेही म्हणतात. पाण्यामध्ये सैंधव मीठ मिसळून प्यायल्याने तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होईल.



एक ग्लास पाण्यामध्ये पाव चमचा सैंधव मीठ म्हणजे रॉक सॉल्ट मिसळा. आता हे पाणी सरबताप्रमाणे हळूहळू प्या.



सैंधव मिठामध्ये अनेक प्राकृतिक गुण आढळतात. यामुळे शरीराती तीनही दोष, वात-पित्त-कफ यांचे संतुलन राखले जाते.



आयुर्वेदानुसार, वात-पित्त-कफ हे शरीराचं संतुलन राखतात. या तीन दोषांमधील असमतोल प्रत्येक रोगाचे मूळ असल्याचे मानले जाते.



सैंधन मिठाचे सेवन केल्याने पचन क्रिया सुधारते आणि चयापचय वाढते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि कोणत्याही विषाणू किंवा जीवाणूंचा शरीरावर हल्ला रोखण्यास मदत होते.



तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी तुम्हाला दररोज एक ग्लास हे पाणी प्यावे लागेल. तुमच्या शरीराला आवश्यक खनिजे मिळतील. खनिजांच्या संतुलित प्रमाणामुळे तुमची प्रतिकारशक्ती सुधारेल.