आपण नेहमी कलिंगड खाल्ल्यानंतर त्याच्या बिया फेकून देतो. पण असं करण्याआधी कलिंगडाच्या बियांचे भन्नाट फायदे जाणून घ्या. कलिंगडामध्ये जास्त प्रमाणात पाणी असते, त्यामुळे याची शरीर हायड्रेड ठेवण्यास मदत होते. पण कलिंगडासोबतच त्याच्या बियांमध्येही आहेत अनेक पोषकतत्वे आहेत, हे तुम्हाला माहित आहे का? आपण नेहमी कलिंगड खाल्ल्यानंतर कलिंगडाच्या बिया फेकून देतो. पण असं करण्याआधी कलिंगडाच्या बियांचे भन्नाट फायदे जाणून घ्या. कलिंगडाच्या बियांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. या बियांचे सेवन केल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो. कलिंगडाच्या बियांमध्ये प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, कॅल्शियम, लोह, मॅग्नीशियम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम, झिंक, तांबे, मॅगनीज, फोलेट, फॅटी ॲसिड ही पौष्टिक तत्वे आढळतात. पोटॅशियम, मॅग्नेशियम, प्रथिने आणि कॅल्शियम समृद्ध आहार घेणे हृदयासाठी उत्तम मानला जातो. कलिंगडाच्या बिया यांचा उत्तम स्त्रोत आहे. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. या संबंध थेट हृदयाच्या आरोग्याशी आहे. यामुळे अनेक पोषक तत्वांनी युक्त कलिंगडाच्या बियाचे सेवन केल्याने हृदयाच्या समस्या दूर ठेवण्यास आणि त्यापासून तुमचे संरक्षण करण्यास मदत होऊ शकते. कलिंगडाच्या बिया रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील फायदेशीर ठरतात. यामुळे शरीराला रोगांपासून संरक्षण मिळते आणि त्यांच्याशी लढण्यासाठी मदत होते.