आहाराकडे दुर्लक्ष केल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. एका रिपोर्टनुसार, अधिक गोड पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.



जास्त प्रमाणात गोड पदार्थ आणि साखरेचे सेवन करणाऱ्यांना मधुमेहाचा धोका जास्त असतो, पण साखरेमुळे मधुमेहाप्रमाणे इतर गंभीर आजारांचाही धोका असतो.



अधिक गोड खाल्ल्यामुळे हृदयविकार आणि कॅन्सरसारख्या समस्यांचा धोकाही असतो. यामुळे आरोग्य तज्ज्ञ साखरेचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला देतात.



जर तुम्हीही जास्त गोड खाण्याचे शौकीन असाल तर काळजी घ्या आणि वेळीच सावधगिरी बाळगत आहारातील साखरेचं प्रमाण कमी करा.



साखरेमुळे तुमच्या शरीराची मोठी हानी होऊ शकते. अगदी सॉस असो किंवा पीनट बटरपर्यंत या सर्व पदार्थांमध्ये साखर असते. हे पदार्थ आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतात.



आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अतिसेवनामुळे लठ्ठपणा आणि टाईप-2 मधुमेह, हृदयविकार यांसारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे तुमच्या आहारातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे फार महत्वाचे आहे.



जास्त वजन किंवा लठ्ठपणा हे अनेक गंभीर आजारांचे कारण मानले जाते. जर तुम्ही जास्त गोड खाण्याचे शौकीन असाल तर सावध व्हा.



अभ्यासानुसार संशोधकांना असे आढळून आले आहे की, साखरेचा समावेश असलेल्या गोष्टी वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे.



सोडा, ज्यूस आणि गोड चहा यासारख्या गोड पेयांमध्ये फ्रॅक्टोजचे प्रमाण जास्त असते, यामुळे जास्त भूक लागते.



अधिक साखरेचे सेवन केल्याने हृदयविकारासह इतरही अनेक रोगांचा धोका वाढतो.



संशोधनात असे आढळून आले आहे की, साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या आहारामुळे लठ्ठपणा आणि जळजळ तसेच रक्तातील साखर आणि रक्तदाबाची पातळी वाढू शकते. यामुळे हृदयविकाराच्या धोका वाढतो.