हिंगामध्ये अँटीबायोटिक, अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल संयुगे असतात. पोटफुगीपासून त्वरित आराम मिळण्यासाठी नाभीवर हिंग पावडर आणि मोहरीच्या तेलाची मालिश केली जाते. आल्यासोबत हिंग मिसळून खाऊ शकता, हा पोटदुखी कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. पोटदुखी अनेकदा अपचन आणि गॅसमुळे होते. अशा वेळी हिंग दोन्हीसाठी कमालीचे काम करते. एक कप गरम पाण्यात आले पावडर, खडे मीठ आणि चिमूटभर हिंग मिसळा, आता त्याचा चहा बनवा. अॅसिडीटी आणि पोट फुगीपासून झटपट आराम मिळण्यास मदत होते जेवणात हिंग टाकण्याची परंपरा खूप जुनी आहे, त्यामुळे जेवणाची चव वाढते आणि गॅसची समस्या कमी होते.