भारतीय संविधानाचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त समीर चांदरकर या कलाकारानं अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलंय. मालवणमधील चौके येथील चित्रकला शिक्षक समीर चांदरकर पिंपळाच्या पानात बाबासाहबांच चित्र कोरल आहे. पिंपळाच्या पानावर बाबासाहेबांच चित्र कोरत त्यांनी चित्राच्या माध्यमातून विनम्र अभिवादन केलंय. बौद्ध धर्मामध्ये बोधी (पिंपळ) वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. याच बोधीवृक्षाखाली गौतम बुध्दांना ज्ञान प्राप्ती झाली. गौतम बुध्दांनी दिलेला मानवतेचा संदेश आजही मानवजातीच्या कल्याणासाठी मार्गदर्शक ठरत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारून गौतम बुद्धांची हिच शिकवण समस्त जगाला दिली. त्यांनी दिलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय या मूल्यांवरच संविधानाचा पाया रचला गेला.