शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते, तसेच शेंगेत लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.



शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते.



शेवग्याच्या शेंगांमुळे शरीरातील कॅल्शियम चे प्रमाण वाढते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.



शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते.



शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे वजनावर नियंत्रण राहते.



शेवग्याची पाने आणि नारळाच्या पाण्याचे मिश्रण करून पिल्यामुळे जुलाब आणि कावीळ यापासून सुटका होते.



ज्या लोकांना डायबिटीस आहे त्या लोकांसाठी शेवगा खूप फायदेशीर आहे त्यांनी आपल्या आहारात शेवग्याच्या शेंगेचा वापर करावा.



शेवग्याच्या शेंगेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक तत्वे असतात.



पानांचा रस आणि मध मोतीबिंदू असलेल्या रोग्यांसाठी खूप फायदेशीर ठरतो.



शेवग्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.