बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करुन त्वचेवर लावावा, त्यामुळे त्वचेवरील डाग नाहीसे होऊन त्वचा उजळते.



या मिश्रणात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. जे त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं.



उन्हामध्ये बाहेर फिरल्याने सनबर्नचा त्रास होतो, यापासून सुटका करुन घेण्यासाठी बटाट्याचा रस थंड करुन त्वचेवर लावावा.



त्यामुळे काळपटपणा दूर होतो आणि त्वचा शांत आणि नितळ होते.



त्वचेचा रखरखीतपणा दूर करण्यासाठी एक चमचा दह्यामध्ये, २ चमचे बटाट्याचा रस एकत्र करुन त्वचेवर लावावा.



२० मिनिटांपर्यत ठेवल्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्यावं. त्यामुळे त्वचेला पोषण मिळतं आणि रखरखीतपणा दूर होतो.



बटाट्याच्या रसामध्ये लिंबाचा रस आणि मध घालून त्वचेवर लावावं आणि २० मिनिटांनी धुवावं.



या मिश्रणामध्ये ब्लिचिंगचे गुणधर्म असतात ते त्वचेचा काळेपणा आणि डाग दूर करण्यासाठी मदत करतात.



बटाट्याच्या रसामध्ये बेकिंग सोडा घालून मिश्रण एकत्र करावं आणि चेहऱ्यावर लावावं.



यामुळे त्वचेची रोमछिद्र स्वच्छ होण्यास मदत होते.