आपण पक्ष्यांना आकाशात उडताना किंवा झाडावर बसलेले नेहेमी पाहतो.

अनेक पक्षी हे जमिनीवर येऊन दाणे टिपतात.

पण एक पक्षी असा आहे जो जमिनीवर पायच ठेवत नाही.

तुम्हालाही प्रश्न पडला असेल की असा कोणता पक्षी आहे.

हा पक्षी म्हणजे 'हरियाल'. तो कबुतरासारखा दिसतो.

या पक्षाला हिरवे कबूतर असे म्हटले जाते.

हा पक्षी भारतीय उपखंडात आढळतो.

त्याच्या रंगामुळे त्याला हरियाल पक्षी असे नाव मिळाले आहे.

भारतातील वाळवंट सोडून तो सगळीकडे आढळतो

तसेच भारताबाहेर श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, बर्मा आणि चीन या देशांमध्ये ही आढळतो.