भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.



जो सध्या तुफान व्हायरल होत असून व्हायरल होण्यामागे दोन मोठी कारणे आहेत. पहिलं म्हणजे, या फोटोमध्ये हार्दिक हा कॅप्टन कूल एमएस धोनीसोबत दिसत आहे.



धोनीचे मैदानाबाहेरचे फोटो सोशल मीडियावर क्वचितच पाहायला मिळतात.



तसंच हा फोटो प्रसिद्ध हिंदी सिनेमा शोलेच्या 'जय आणि वीरू' यांच्याप्रमाणे दोघांनी काढला आहे.



या फोटोमध्ये हार्दिक आणि धोनी एकाच बाईकवर बसले आहेत. जी शोले सिनेमामध्ये दिसली होती.



जय म्हणजेच अमिताभ बच्चन आणि वीरू म्हणजेच धर्मेंद्र या अभिनेत्यांचा भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक असलेल्या 'शोले'मधी लूकमध्ये दोघे दिसत आहेत.



या फोटोच्या कॅप्शनमध्ये हार्दिकने शोलेचा उल्लेखही केला आहे.



पांड्याने लिहिले आहे, 'शोले-2 लवकरच येत आहे' ज्यामुळे हा फोटो अनेकजण लाईक आणि पुन्हा शेअर करत आहेत.



काही दिवसांपूर्वीच पांड्यासोबतचा धोनीचा नाचतानाचा  एक डान्स व्हिडीओही व्हायरल झाला होता. 



पांड्या आणि धोनी यांचं ऑफफिल्ड नातं फार जवळचं असल्याचं दिसून आल