ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर आज अंत्यसंस्कार पार पडणार आहेत
त्यांचं पार्थिव लंडनमधील (London) किंग जॉर्ज चतुर्थ मेमोरियल चॅपलमध्ये दफन करण्यात येईल
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख आणि दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत
महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील उपस्थित राहणार आहेत
राष्ट्रपती सध्या लंडन दौऱ्यावर असून त्यांनी रविवारी वेस्टमिन्स्टर हॉलला भेट देत महाराणींचं अंत्यदर्शन घेतलं
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झालं
नंतर मंगळवारी त्यांचं पार्थिव 13 सप्टेंबर रोजी इंग्लंडमध्ये दाखल झालं
त्यानंतर त्यांचं पार्थिव वेस्टमिन्स्टर हॉलला येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं
त्यांच्यावर आज 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रात्री 12 वाजता शाही कुटुंब महाराणीला कायमचा निरोप देईल आणि महाराणी एलिझाबेथ यांना त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्या शेजारील समाधीमध्ये दफन करण्यात येईल