कार्तिक महिन्यात तुळशी पूजन विशेष फलदायी मानलं जातं. तुळशीची पूजा केल्याने भगवान श्री हरी विष्णूसह देवी लक्ष्मीची कृपा होते. कार्तिक महिन्यात रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावं. संध्याकाळी तुळशीच्या खाली तुपाचा दिवा लावल्याने घरातील गरिबी दूर होते. ब्रह्म मुहूर्तावर पहाटे उठून तुळशीला जल अर्पण करावं तुळशीसमोर दिवा लावावा. तुळशीची पूजा करताना तुलसी मंत्राचा जप करणं शुभ मानलं जातं. कार्तिक महिन्यात तुलसी नामाष्टकाचं पठण आणि श्रवण करावे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दिवे लावून घराच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. अंघोळ न करता कधीही तुळशीला स्पर्श करू नये.