सौंदर्य आणि उत्कृ्ष्ट अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे यामी गौतम होय. यामी गौतम आज 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. यामी अभ्यासात चांगली असल्याने आपण आयएएस अधिकारी व्हावं अशी तिची इच्छा होती. पण अभिनयाने खुनावल्याने तिची ही इच्छा मागे पडली. वयाच्या 20 व्या वर्षी यामीने सिनेसृष्टीत करिअर करण्याचं ठरवलं. 'चांद के पार चलो' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाच्या माध्यमातून यामीने अभिनयक्षेत्रात पाऊल टाकलं. यामीने 'मीठी चुरी नंबर वन', 'किचन चॅम्पियन' सारखे अनेक रिअॅलिटी शो केले आहेत. 'विकी डोनर' या सिनेमाने यामी गौतमला लोकप्रियता मिळाली. यामी 4 जून 2021 रोजी सिनेदिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्नबंधनात अडकली आहे. मालिका आणि सिनेमांसह यामीने अनेक मोठ-मोठ्या ब्रँडच्या जाहिराती केल्या आहेत. यामीची एकूण संपत्ती 40 कोटी रुपयांच्या आसपास आहे.