फिल्म क्रिटीक्स तसेच प्रेक्षक हे सध्या अजय देवगणच्या दृष्यम-2 या चित्रपटाचं कौतुक करत आहेत.


दृश्यम-2 हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला.


अजयच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केली आहे.


आता चित्रपट रिलीज होऊन नऊ दिवस झाले आहेत. तरी देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.


दृष्यम-2 नं दुसऱ्या आठवड्यात धमाकेदार एन्ट्री केली.


नवव्या दिवशी म्हणजेच शनिवार (26 नोव्हेंबर) या चित्रपटानं जवळपास 13.50-14 कोटींची कमाई केली आहे.


दृश्मय-2 या चित्रपटानं एकूण 140 कोटींची कमाई केली आहे.


दृश्यम-2 या चित्रपटाची निर्मिती 50 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे.


'दृश्यम 2' या मल्याळम सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे.


अजयच्या 2015 मध्ये रिलीज झालेल्या दृश्यम या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते.