बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस गेल्या काही दिवसांपासून 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. जॅकलिनने पटियाला कोर्टात कलम 164 अंतर्गत जबाब नोंदवला आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिनला काही नवीन खुलासे करायचे होते. त्यामुळे ईडीने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जॅकलिनचा जबाब नोंदवला आहे. आर्थिक गुन्हे शाखेसमोर जॅकलिन नेमकं काय म्हणाली हे अद्याप समोर आलेलं नाही. सुकेश चंद्रशेखर विरोधात जॅकलिनने वक्तव्य केलं असल्याचा अंदाज आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसची पुढची सुनावणी 12 डिसेंबरला होणार आहे. 12 डिसेंबरपर्यंत कोर्टाने तिला आरोप सिद्ध करण्यासाठी वेळ दिला आहे. जॅकलिन फर्नांडिला सुकेश चंद्रशेखरनं महागड्या वस्तू भेट दिल्या होत्या. जॅकलिनचा आगामी 'सर्कस' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.