बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया आज 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री असण्यासोबत तारा एक उत्तम नृत्यांगणा आहे. ती तिच्या नृत्याने नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. तारा सुतारियाने 'स्टूडंड ऑफ द इअर' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ताराचा 'एक व्हिलन रिटर्न्स' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तारा सुतारिया बॉलिवूड अभिनेता आदर जैनला डेट करत असून अनेकदा त्यांच्या लग्नाच्या चर्चांमुळे चर्चेत असते. 'मरजावा', 'तडप', 'एक व्हिलन रिटर्न', 'हीरोपंती 2' अशा बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय सिनेमांत ताराने काम केलं आहे. ताराने सिनेमांसह अनेक मालिकांमध्येदेखील काम केलं आहे. लवकरच तिचा आगामी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तारा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. अभिनेत्री, नृत्यांगणा असण्यासोबत तारा गायिकादेखील आहे. 'तारे जमीन पर' या लोकप्रिय सिनेमात ताराने गाणं गायलं आहे. ताराचा 'अपूर्वा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या सिनेमावर काम सुरू आहे.