अभिनेत्री चित्रांगदा सिंहचं नवा बोल्ड आणि सिझलिंग फोटोशूट समोर आलं आहे. मोकळे केस, न्यूड स्मोकी आय मेकअप आणि रेड लिपस्टिकमध्ये चित्रांगदा सिंह नेहमीप्रमाणे स्टनिंग दिसत आहे. वयाच्या चाळीशीत असणाऱ्या अभिनेत्री चित्रांगदा सिंहचं ग्लॅमर तरुणाईला लाजवेल असं आहे. अभिनेत्री चित्रांगदा सिंह सध्या 46 वर्षाची आहे, पण तिच्याकडे पाहिल्यावर तिच्या वयाचा अंदाज येत नाही. इतकंच नाही तर तिला एक 14 वर्षांचा मुलगा देखील आहे. चित्रांगदा सिंह अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेल आणि चित्रपट निर्मातीही आहे. चित्रांगदाने चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रांगदा तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त फिटनेसच्या बाबतीतही चर्चेत असते. चित्रांगदाचा जन्म राजस्थानमध्ये झाला. तिचं शिक्षण राजस्थान आणि दिल्लीमध्ये झालं आहे. चित्रांगदाने 2005 साली 'हजारो ख्वाईशे ऐसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रांगदाने चित्रपटसृष्टीत येण्याआधीच 2001 मध्ये भारतीय गोल्फर ज्योती रंधवासोबत लग्न केले. त्यांना एक मुलगाही आहे. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट घेतला.