आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहणारी नेहा भसीनचा आज 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. नेहा भसीनने हिंदीसह पंजाबी, तामिळ आणि तेलुगू भाषेतदेखील गाणी गायली आहेत. नेहाने 2004 साली संगीतक्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली.पण 2007 साली प्रदर्शित झालेल्या 'फॅशन' सिनेमामुळे तिला लोकप्रियता मिळाली. नेहाने तिच्या आवाजाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्मा केली आहे. नेहा भाईजानच्या 'बिग बॉस'मध्येदेखील सहभागी झाली होती. ‘जग घूमेया’, ‘कुछ खास’, ‘दिल दिया गल्ला’ यांसारख्या सुपरहिट गाण्यांनी नेहाने आपला ठसा उमटवला आहे. नेहा गाण्यांसोबत तिच्या खासजी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. तिने बॉलिवूडचे लोकप्रिय संगीत दिग्दर्शक अनु मलिक यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. नेहा भसीनने संगीत क्षेत्रात दोन दशके पूर्ण केली आहेत. या प्रवासात तिने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. नेहाला 'कुछ खास है' या गाण्यासाठी फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट गायनासाठी नामांकन मिळाले होते. नेहा भसीन तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. तिने अनेक हिट गाणी गायली आहे. नेहाने 'धुनकी लागे', 'कुछ खास है', 'स्वैग से स्वागत', 'हिरीये' यांसारख्या गाण्याने चाहत्यांना तिच्या आवाजाच्या प्रेमात पाडलं.