बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. अनन्याने एका मॅगझिनसाठी केलेलं हे फोटोशूट फारच ग्लॅमरस आणि बोल्ड आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' चित्रपटातून आपल्या करिअरची सुरूवात केली. अनन्या पांडे सध्या 24 वर्षांची आहे. अगदी कमी वेळात इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनन्या कधी क्यूट, तर कधी बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अनन्या बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. अनन्या 'लायगर' चित्रपटातून साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत दिसली होती. या चित्रपटातून अनन्याने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील पदार्पण केलं. अनन्याचा जन्म आणि शिक्षण मुंबईमध्येच झालं आहे. अनन्याला एक लहान बहिण आहे. अनन्या तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी दोन कोटी मानधन घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनन्या पांडेची एकूण संपत्ती 30 कोटींहून अधिक आहे. अनन्या पांडेचे इन्स्टाग्रामवर 24 मिलियन फॉलोअर्स आहेत. अनन्या अनेकदा इन्स्टाग्रामवर अनेकदा बोल्ड आणि सिझलिंग फोटो शेअर करत असते.