आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करण्यासोबत तब्बूने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज तब्बू 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. तब्बूने तिच्या सिनेसृष्टीतील प्रवासात एकापेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. अभिनयासोबत प्रेमप्रकरणामुळे तब्बू कायम चर्चेत राहिली आहे. तब्बूचं नाव दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनसोबत जोडलं गेलं होतं. तब्बू आणि नागार्जुन एकमेकांना डेट करत होते. 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतरही त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही. नागार्जुनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तब्बू अभिनेता संजय कपूरला डेट करायला लागली. त्यानंतर तिचं नाव लोकप्रिय दिग्दर्शक साजिद नाडियादवालासोबत जोडलं गेलं. पण त्यांचं नातंदेखील फार काळ टिकू शकलं नाही.