मराठी मनोरंजनसृष्टीतील 'चॉकलेट बॉय' स्वप्नील जोशीने बालपणीच मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालण्यासोबत त्याने मराठी-हिंदी मालिका, सिनेमे आणि वेबसीरिज अशा सर्वच माध्यमांत काम केलं आहे. विनोदी अभिनेता म्हणून लोकप्रिय असलेल्या 'चॉकलेट बॉय' स्वप्नील जोशीचा आज वाढदिवस आहे. रामानंद सागर यांच्या सुपरहिट ठरलेल्या 'श्री कृष्णा' या मालिकेत स्वप्नीलने साकारलेली कृष्णाची भूमिका प्रचंड गाजली. वयाच्या नवव्या वर्षी 'रामायण' या मालिकेत स्वप्नीलने काम केलं आहे. बालपणी आसपास सांस्कृतिक वातावरण असल्याने स्वप्नीलला कलेची आवड निर्माण झाली. स्वप्नील जोशी हा मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. स्वप्नीने जोशीची सध्या मालिका सुरू असली तरी त्याचे अनेक सिनेमे पाईपलाईनमध्ये आहेत. चॉकलेट बॉय लवकरच 'सिटी ऑफ ड्रीम्स' या बहुचर्चित वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. 'सिटी ऑफ ड्रीम्स'चा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात स्वप्नील गृहमंत्र्याच्या भूमिकेत दिसून शकतो.