भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने डायमंड लीग फायनल जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

स्वित्झर्लंडच्या झुरिचमध्ये अ‍ॅथलेटिक्समधल्या प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेची मेगा फायनल पार पडली

या स्पर्धेत भारताचा स्टार अ‍ॅथलीट नीरज चोप्राने डायमंड लीगच्या भालाफेक प्रकारात  ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

हा किताब पटकावणारा नीरज चोप्रा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.  

नीरज चोप्राने झुरिच येथे झालेल्या फायनलमध्ये 88.44 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह विजेतेपद पटकावले.

डायमंड लीगच्या फायनलमध्ये नीरजची सुरुवात चांगली झाली नाही. त्याचा पहिला थ्रो फाऊल होता.

दुसऱ्या प्रयत्नात त्याने 88.44 मीटर अंतरावर भाला फेकला.  

तिसऱ्या प्रयत्नात 88.00 मीटर, चौथ्या प्रयत्नात 86.11 मीटर तर पाचव्या प्रयत्नात 87.00 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 83.60 मीटर भाला फेकला.

या अंतिम फेरीत झेक प्रजासत्ताकचा जेकोब 86.94 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह दुसरा राहिला

तर जर्मनीचा ज्युलियन वेबर 83.73 मीटर फेकसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला.