प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.
रश्मिकानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील लोकप्रियता मिळवली आहे.
सोशल मीडियावर काही नेटकरी रश्मिकाच्या अभिनयाचं कौतुक करतात तर काही तिला ट्रोल करतात.
आता नुकतीच रश्मिकानं ट्रोलिंगबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
रश्मिकानं तिचा एक फोटो शेअर करुन पोस्टमध्ये लिहिलं, 'गेल्या काही दिवसांपासून, महिन्यांपासून किंवा वर्षांपासून काही गोष्टींमुळे मला त्रास होत आहे. मला वाटते की मी यावर लक्ष देण्याची वेळ आली आहे.'
'मी करिअरला सुरुवात केल्यापासून मला खूप द्वेषाचा सामना करावा लागला आहे. ट्रोलर्स मला अक्षरशः एका पंचिंग बॅग प्रमाणे वागणूक देत होते.' असंही रश्मिकानं पोस्टमध्ये लिहिलं.
वयाच्या 17 व्या वर्षी रश्मिकाने आपल्या करिअरला सुरुवात केली.