प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) आज (1 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे.
टीव्ही विश्वापासून सुरु झालेला तिचा हा प्रवास आज बॉलिवूडपर्यंत येऊन पोहोचला आहे.
मृणाल ठाकूरचा जन्म 1 ऑगस्ट 1992 रोजी महाराष्ट्रातील नागपूर शहरात झाला. अभिनेत्रीने मुंबईतून शिक्षण पूर्ण केले आहे.
'मुझसे कुछ कहती हैं... ये खामोशियां' या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, त्यानंतर ती 'कुमकुम भाग्य'मध्ये झळकली होती.
या मालिकेमुळे मृणाल खूप लोकप्रिय झाली. अनेक मालिकांमधून ती काम करत राहिली.
या मालिकेदरम्यानच ती चित्रपटांसाठी देखील ऑडिशन देत होती.
मृणालने 2014 मध्ये मराठी चित्रपट ‘संध्या’द्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते.
2018 मध्ये ती इंडो अमेरिकन फिल्म 'लव्ह सोनिया'मध्ये दिसली होती. तिने आपल्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले. या चित्रपटाद्वारे तिने आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये पदार्पण केले.
मृणाल नुकतीच शाहिद कपूरसोबत 'जर्सी' या चित्रपटात दिसली होती.
या चित्रपटात अभिनेत्री शाहिद कपूरच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारताना दिसली होती. या चित्रपटात दोघांची केमिस्ट्री अप्रतिम होती.