भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रीपैकी एक आहे. भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा आज 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. मोनालिसा तिच्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. मोनालिसा आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मोनालिसाने सिनेमांसह मालिकांमध्येदेखील काम केलं आहे. मोनालिसा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोनालिसा चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. मोनालिसाने आतापर्यंत 100 सिनेमांत काम केलं आहे. मोनालिसाने 1997 साली 'जयते' या हिंदी सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. मोनालिसाने 'रात्री के यात्री 2' या वेबसीरिजमध्येदेखील काम केलं आहे.