प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह हा त्याच्या गाण्यांनी नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. आज (19 नोव्हेंबर) बादशाहचा वाढदिवस आहे. बादशाहचं खरं नाव आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया असं आहे. बादशाहचा जन्म 19 नोव्हेंबर 1985 रोजी दिल्लीमध्ये (Delhi) झाला. बादशाह हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. बादशाहचे दिल्लीत स्वतःचे घर आहे, ज्याची किंमत 12 कोटी रुपये आहे. बादशाहकडे अनेक लग्झरी गाड्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, बादशाहची एकूण संपत्ती 37 कोटी रुपये आहे. बादशाहने 2006 मध्ये प्रसिद्ध गायक आणि रॅपर असणाऱ्या हनी सिंहसोबत आपल्या करिअरची सुरुवात केली. ल गेंदा फूल, पानी पानी जुगनु, हाय गरमी, लेट्स नाचो या बादशाहच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.