'गॉडफादर' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. गॉडफादर हा चित्रपट 5 ऑक्टोबरला चित्रपटगृहात रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. ज्यांनी गॉडफादर हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिला नाही, ते प्रेक्षक आता हा चित्रपट घरबसल्या ओटीटीवर पाहू शकतात. गॉडफादर हा चित्रपट नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. तेलगू आणि हिंदी या भाषेमध्ये तुम्ही हा चित्रपट ओटीटीवर पाहू शकता. गॉडफादर या चित्रपटाचं दिग्दर्शन मोहन राजा यांनी केलं आहे. चिरंजीवी यांच्यासोबतच सत्यदेव, नयनतारा, ब्रह्माजी आणि सलमान खान यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. अभिनेता जिरंजीवीनं या चित्रपटात ब्रह्मा ही भूमिका साकारली आहे.