सिने-निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक राजकुमार हिरानी यांचा आज साठावा वाढदिवस आहे. बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि चतुरस्त्र दिग्दर्शक अशी राजकुमार हिरानी यांची ओळख आहे. राजकुमार हिरानी यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तर 11 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. राजकुमार हिरानी यांनी 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लगे रहो मुन्नाभाई', '3 इडियट्स', 'पीके' आणि 'संजू' या ब्लॉकबस्टर सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. 20 नोव्हेंबर 1962 रोजी नागपुरातील सिंधी कुटुंबात जन्मलेल्या राजकुमारी हिरानी यांना राजू हिरानी असेही म्हटले जाते. राजकुमारी हिरानी यांचा सिनेसृष्टीतील प्रवास खऱ्या अर्थाने 2003 साली सुरू झाला. 'मुन्नाभाई एमबीबीएस' हा दिग्दर्शक म्हणून राजकुमार हिरानी यांचा पहिला सिनेमा होता. राजकुमार हिरानी यांची एकूण संपत्ती तेराशे कोटींच्या आसपास आहे. राजकुमार हिरानी यांचा 'डंकी' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. राजकुमार हिरानी यांना 'चित्रपट दिग्दर्शनाची परिभाषा बदलणारे' असं म्हटलं जातं.