'नागिन'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अर्जुन बिजलानीची गणना छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत होते. अर्जुन आज त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. अर्जुन बिजलानीला अभिनयाची प्रचंड आवड आहे. वयाच्या 19 व्या वर्षी वडिलांचे निधन झाल्याने घराची संपूर्ण जबाबदारी अर्जुनकडे आली. त्यामुळे आवड जोपासत त्याने पैसे कमवण्याचा निर्णय घेतला. अर्जुन बिजलानी हा छोट्या पडद्यावरचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. एका एपिसोडसाठी तो 80 हजार ते 1.5 लाख रुपये घेतो. तर जाहिरातीसाठी 30 ते 40 लाख रुपये आकारतो. पाच कोटींहून अधिक त्याचे वार्षिक उत्पन्न आहे. त्याच्याकडे महागड्या गाड्यांसह 10 कोटींचे आलिशान घर आहे.