बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता हे 54 व्या वर्षी लग्नबंधनात अडकले आहेत हंसल मेहता यांनी सफीना हुसैन यांच्यासोबत लग्नगाठ बांधली हंसल मेहता आणि सफीना हुसैने हे लाँग टाइम लिव्ह इन पार्टनर आहेत हंसल मेहता यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले या पोस्टमधून त्यांनी आपल्या चाहत्यांना लग्नाची बातमी दिली '17 वर्षानंतर आपल्या मुलांना मोठं होताना पाहात असताना तसेच स्वत:ची स्वप्न पूर्ण करत असताना आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी म्हटले जीवनातील इतर गोष्टींसारखेच हे पण अचानक पद्धतीनं घडलं. प्रेम हे इतर गोष्टींवर विजय मिळवते, या शब्दात त्यांनी भावना व्यक्त केली हंसल मेहता यांना अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता राजकुमार रावनं कमेंट करत लिहिलं, 'माझ्या सर्वात आवडत्या जोडीला मी शुभेच्छा देतो.' मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तसेच अगदी साध्या पद्धतीनं हंसल मोहता यांचा विवाह सोहळा पार पडला