पुदिन्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असल्याने, ते सेंद्रिय टूथपेस्टमध्ये देखील वापरले जाते.
पुदिन्याची पाने रिकाम्या पोटी चघळल्याने तोंडाचे आरोग्य चांगले राहते. तसेच वाईट दुर्गंधी येत नाही.
त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे, पुदिन्याचा चहा सायनस बंद करण्यात मदत करण्यासाठी ओळखला जातो.
पुदिन्याचा चहा ऊर्जा देण्यास खूप मदत करू शकतो. हे कॅलरी आणि चरबीपासून तुम्हाला दूर करतं.
पुदिन्यात विषाणूविरोधी गुण असतात. यामुळेच सामान्य सर्दी किंवा फ्लूसाठी हा एक चांगला पर्याय मानला जातो.
काही संशोधनानुसार, पुदिन्याचा चहा वेदना आणि क्रॅम्प्स मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. यात आरामदायी घटक असतात.
पुदिन्याचा चहा मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.