आयपीएल 2022 गुजरात टायटन्स संघाने दिमाखात जिंकली आहे.



अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे.



राजस्थानकडून जोस बटलरने केवळ 39 धावांची एकहाती झुंज दिली.



गुजरातच्या भेदक गोलंदाजीमुळे राजस्थानची फलंदाजी 130 धावांवरच ढासळली.



गुजरात संघाच्या सर्वच खेळाडूंनी कमाल गोलंदाजी केली. पण कर्णधार हार्दिक पांड्याने महत्त्वपूर्ण तीन विकेट्स घेतल्या.



131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना साहा आणि वेड यांना स्वस्तात माघारी गेले.



हार्दिकने महत्त्वपूर्ण 34 धावा केल्यावर चहलने त्याला बाद केलं.



पण मिलरने 32 धावांची तुफान खेळी करत गुजरातचा विजय पक्का केला. 



शुभमनच्या नाबाद 45 धावा संघासाठी महत्त्वाच्या ठरल्या.



गुजरातने 18.1 षटकात तीन गडी गमावून विजयश्री मिळवला.