पेरूप्रमाणेच त्यांची पानंसुद्धा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पेरूची पाने उकळून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. पेरूची पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय आरोग्यदायी असतात. यामध्ये असलेले फिनोलिक तत्व रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी आहे. पेरूच्या पानांमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यात प्रभावी ठरतात. उकळलेली पेरूची पाने नियमित प्यायल्याने तुम्ही वृद्धत्वाची लक्षणे कमी करू शकता. पेरूच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. जर तुम्हाला गॅस्ट्रिक अल्सरचा त्रास होत असेल तर तुमच्या आहारात पेरूच्या पानांचा रस प्या. यामुळे तुमची पचनक्रिया चांगली होईल. यासोबतच पोटातील अल्सरपासूनही सुटका मिळेल. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.