पित्त कमी करण्यासाठी काळ्या मनुक्यांचे पाणी प्यावे.
लवंगामुळे पोटफुगी आणि गॅसचे त्रास दूर होतात.
शरीरात खूप जास्त उष्णता झाल्यास तांदळाची पेज प्यावी.
अॅसिडिटीवेळी छातीत जळजळ होत असेल तर बडीशेपचे पाणी प्यावे.
जिऱ्याच्या सेवनामुळे पचन सुधारते आणि गॅसचे विकार दूर होतात.
पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करतो, त्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते.
अंगावर पित्त उमटले असेल तर कोकमाचा रस अंगाला लावावा.
आल्यातील पाचक रसामुळे आम्लपित्त ,वातविकार कमी होण्यास मदत होते.
पित्ताचा त्रास जास्त होत असल्यास रोज ५-६ तुळशीची पाने खावी.
दररोज मोरावळा खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होतो.