हृदयविकाराचा झटका , स्ट्रोक आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर आजाराचं प्रमाण वाढत चाललं आहे.

वातावरणातील बदल, बिघडलेली जीवनशैली आणि कामाचा वाढता ताण हे यामागील कारण मानलं जातं.

'कोरोनरी आर्टरी डिसीज' हा एक आनुवंशिक आजार आहे.

ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजाराचा कौटुंबिक इतिहास तयार होतो.

हृदयविकाराचा धोका कसा कमी करायचा यावर उपाय-

उपाय १

वजन वाढल्याने हृदय, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या समस्यांचा धोका वाढतो, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवा.

उपाय २

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहिल्यास हृदय किंवा पोटाशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत.

उपाय ३

मद्यपानाच्या सवयीमुळे यकृत तर कमकुवत होतेच पण पोटाशी संबंधित अनेक आजारही निर्माण होतात.

उपाय ४

व्यायाम आणि योगामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, त्यामुळे दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा.

उपाय ५

तंबाखू आणि धुम्रपान हृदयासाठी अत्यंत घातक आहे, त्यामुळे तंबाखूचे सेवन टाळा.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.