बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि सुनीत आहुजा यांची लव्ह स्टोरी फिल्मी आहे. गोविंदा आणि सुनीत यांच्या नात्यात अनेक चढउतार आले. गोविंदा आणि सुनीत यांनी 1987 मध्ये लग्नगाठ बांधली. सुनीता आणि गोविंदा यांच्या सोशल मीडियावरील फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते. गोविंदा आणि सुनीत यांच्यामध्ये लग्नाआधी अनेकवेळा भांडण झाले होते. त्याचं कारण एक अभिनेत्री होती, असं म्हटलं जातं. रिपोर्टनुसार, एकदा गोविंदाने सुनीतासोबतचे नाते तोडण्याचा देखील निर्णय घेतला होता. पण सुनीताने गोविंदाला फोन करुन समजावले, त्यानंतरच दोघांचे लग्न झाले. गोविंदा आणि सुनीता यांना यशवर्धन आहुजा आणि टीना आहुजा ही दोन मुलं देखील आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये गोविंदा आणि सुनीता हजेरी लावत असतात. गोविंदा हा सुनीतासोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करतो. स्वर्ग, शोला और राजा बाबू, कुली नंबर 1 हीरो नंबर 1 या चित्रपटांमध्ये गोविंदाने काम केले.