झोपलेल्या मारुतीचं एकमेव मंदिर!
होय महाराष्ट्रात आहे हनुमंतांचं विश्राम अवस्थेतील मंदिर
झोपलेल्या हनुमानजीचा गोंदियात एकमेव मंदिर....
आज चैत्र पौर्णिमा आणि त्यासोबतच हनुमान जयंती सुद्धा आहे
आज राज्यभरातील अनेक हनुमान मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळतेय.
गोंदिया शहरातील गौतम नगर परिसरामध्ये अतीप्राचीन झोपलेले हनुमानाची स्वयंभु मूर्ती आहे.
गोंदियातली ही झोपलेल्या हनुमानजी ची एकमेव मुर्ती आहे.
आज हनुमान जन्मोत्सव निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
असुन मोठ्या संख्येने हनुमान भक्त याठिकाणी हनुमानजीचे दर्शन घ्यायला पोचले आहेत.
या मंदिरातील मूर्ती सुमारे 300 वर्षे जुनी असल्याचे येथील नागरिक सांगतात.
तर ही मूर्ती भुभागात दगडावर कोरली गेली आहे.