अमावस्येच्या दिवशी मुळीच याचे सेवन करू नका. डाळींचं सेवन करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. पण, शास्त्रांमध्ये काही विशेष दिवसांमध्ये डाळींचं सेवन करण्यास मनाई करण्यात आली आहे. अमावस्येच्या दिवशी काही डाळींचं सेवन करणं टाळावं बुधवारी, 29 जानेवारी 2025 ला मौनी अमावस्या आहे. अशातच जाणून घेऊयात, कोणत्या डाळींचं सेवन केलं पाहिजे, कोणत्या नाही? अमावस्येला कोणत्या डाळींचं सेवन करणं हानिकारक ठरू शकतं. अमावस्येच्या दिवशी चण्याची डाळ आणि मसूरची डाळ याचं सेवन करणं टाळावं. अमावस्येच्या दिवशी या डाळीचे सेवन करणं, हे शास्त्रांनुसार, अशुभ मानलं जातं. कारण हिंदू पुराणांमध्ये मसूर डाळीचा संबंध मांसाहाराशी संबंधित असल्याचं सांगितलं आहे. वैष्णव पद्धतीचं पालन करणारे या डाळीचे सेवन करत नाही. टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.