ग्राहकांसाठी आज सोनं खरेदीसाठी चांगला दिवस आहे.
कारण आज जागतिक बाजारात डॉलरच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे भारतीय बाजारावर त्याचा परिणाम दिसून येतोय.
आज बुलियन्सच्या साईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,510 रूपयांवर आला आहे.
कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरांत हजार रूपयांची घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 67,740 रूपयांवर आला आहे.
सुवर्णनगरी जळगावातही मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्याने वाढ होत होती. या ठिकाणी सोन्याचा दर तब्बल 60 हजारांच्या घरात पोहोचला आहे.
आगामी काळात अजूनही वाढ होण्याची चिन्हे असल्याने ग्राहकांनी भविष्याचा विचार करून सोन्याच्या गुंतवणुकीकडे कल वाढवला आहे.
स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% कमी होऊन 1,585.78 डॉलर प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन 1,796.50 डॉलरवर होते
BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.