नव्या वर्षाची सुरुवात महागाईच्या चटक्याने झाली आहे. इंधन कंपन्यांनी आज एलपीजी गॅस सिलेंडरचे दर (LPG Cylinder Price) जाहीर केले आहेत प्रति सिलेंडरमागे 25 रुपयांची दरवाढ ( Price Hike) करण्यात आली आहे. ही दरवाढ व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडरसाठी लागू करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर महाग झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेल आदींतील खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात. मुंबई व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा दर 1721 रुपये प्रति सिलेंडर इतका आहे. घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडरचा दर मुंबईत 1052.5 रुपये प्रति सिलेंडर इतका आहे. व्यावसायिक वापरासाठी असलेला एलपीजी सिलेंडर 19 किलोचा असतो. तर घरगुती वापरासाठी असलेला एलपीजी सिलेंडर हा 14.2 किलोंचा असतो. मागील सहा महिन्यांपासून घरगुती एलपीजीच्या दरात कोणताही बदल झाला नाही.