फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी व्याजदराबाबत जारी केलेल्या विधानामुळे इक्विटी मार्केटमध्ये मौल्यवान धातूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात आज 400 रुपयांची उसळी पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना सोनं खरेही करणं आज महागात पडू शकतं. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 53,340 रूपयांवर आला आहे. तर, चांदीच्या दरात 1200 रूपयांची वाढ होऊन आज एक किलो चांदीचा दर 64,620 रुपये आहे. चांदीचे दर मागच्या काही दिवसांपासून 61 हजारांवर व्यवहार करत होते. मात्र, आज या दरात उच्चांकी वाढ झाली आहे. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.