आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.25 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 53,080 रूपयांवर आला आहे.
एक किलो चांदीचा दर 61,440 रुपयांवर व्यवहार करत आहे.
मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळतोय.
त्यामुळे या दरम्यान मौल्यवान धातूंची जास्त खरेदी कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळतेय.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकमधली दर पाहता 22 कॅरेट सोन्याचा दर 48,657 वर आला आहे. तर हाच दर इतर शहरांतही दिसून आला.
जागतिक बाजारातील दर पाहता, स्पॉट सोने 0059 GMT नुसार प्रति औंस $1,633.69 वर लिस्टलेस होते, यापूर्वी 21 ऑक्टोबरपासून सर्वात कमी पातळी गाठली होती.
स्पॉट सिल्व्हर 0.2% वाढून $19.18 प्रति औंस, प्लॅटिनम 0.1% घसरून $924.51 वर आणि पॅलेडियम 0.9% वाढून $1,856.91 वर आले.
BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता.
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.