गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे जे वाढते दर होते. हे दर आज किंचित फरकाने कमी झाले आहेत.



त्यामुळे लग्न समारंभासाठी, तसेच इतर विधींसाठी ग्राहकांना सोने-चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे.



आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,970 रूपयांवर आला आहे.



तर, एक किलो चांदीचा दर 61,480 रुपयांवर व्यवहार करत आहे.



मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 52,970 रूपये आहे. तर, पुण्यात मात्र, हा दर 53 हजारांपर्यंत पोहोचला आहे.



त्याशिवाय नाशिक, नागपूर आणि इतर शहरांमध्ये सोन्याचे दर सारखे आहेत.



लग्न समारंभाचे दिवस सुरु असताना ग्राहकांना आज सोने खरेदीची चांगली संधी आहे.



तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.